Ad will apear here
Next
विलास चाफेकर यांना ‘आबासाहेब अत्रे’ पुरस्कार
प्रकाश भोंडे ‘इंदिरा अत्रे’ पुरस्काराचे मानकरी
विलास चाफेकर व प्रकाश भोंडेपुणे : यंदाचा ‘गुरुवर्य आबासाहेब अत्रे’ पुरस्कार वंचित विकास संस्थेचे संस्थापक विलास चाफेकर यांना, तर ‘इंदिरा अत्रे’ पुरस्कार ‘स्वरानंद प्रतिष्ठान’चे विश्वस्त, तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रा. प्रकाश भोंडे यांना जाहीर झाला आहे.  

शनिवारी, ३० नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता, दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. हे दोन्ही पुरस्कार किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या हस्ते देण्यात येणार आहेत. 

डॉ. प्रभा अत्रे यांच्या वतीने त्यांच्या आई-वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ दर वर्षी हे पुरस्कार देण्यात येतात. पुरस्काराचे हे आठवे वर्ष आहे. पुणे शहराच्या पूर्व भागातील आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या दुर्बल अशा वर्गाच्या उन्नतीकरता झटणारी दी रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी ही शिक्षण संस्था नावारूपाला आणण्यासाठी गुरुवर्य आबासाहेब अत्रे व त्यांच्या पत्नी इंदिराबाई अत्रे यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. आबासाहेब अत्रे यांनी शैक्षणिक कार्याच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रातही मौलिक कार्य केले, तर इंदिराबाई अत्रे यांनी कलागुणांची जोपासना करून, त्याचा इतरांना लाभ करून दिला. त्यांच्या स्मरणार्थ हे पुरस्कार देण्यात येतात. 

विलास चाफेकर हे जाणीव संघटना व वंचित विकास या संस्थेचे संस्थापक आहेत. देवदासींना मूळ प्रवाहात आणण्याचे कार्य ही संस्था करते. वयाच्या १७ व्या वर्षी विलास चाफेकरांनी भटक्या, झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांसाठी काम सुरू केले. आज वयाच्या ७९ व्या वर्षीदेखील ते सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. 
 
प्रकाश भोंडे हे बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक असून, ‘स्वरानंद प्रतिष्ठान’ संस्थेचे विश्वस्त या नात्याने सांगीतिक क्षेत्रात अभिनव उपक्रमांचे आयोजन करतात. सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रीय सहभाग असतो. 

(वंचित विकास संस्थेविषयीचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZPXCG
Similar Posts
सवाई गंधर्व यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून ‘सवाई’ला सुरुवात पुणे : पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यान या ठिकाणी असलेल्या सवाई गंधर्व यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून, बुधवार, ११ डिसेंबर रोजी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला औपचारिक सुरुवात करण्यात आली.
अमेरिकन सरोदवादक केन झुकरमन यांनी उलगडली कारकीर्द पुणे : गिटार वाजवत असताना आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा गंधही नसताना सरोदने घातलेली भुरळ, प्रथम सतार शिकण्यास केलेली सुरुवात आणि पुन्हा सरोदच्या शिक्षणाकडे वळलेले पाय आणि सरोदलाच वाहून घेण्याचा मनाने घेतलेला निर्णय… अमेरिकेतील प्रख्यात सरोदवादक केन झुकरमन यांनी आपला प्रवास ‘सवाई’च्या ‘अंतरंग’ कार्यक्रमात उलगडला
‘उच्च शिक्षणासाठी सामाजिक संस्थांचा हातभार महत्त्वाचा’ पुणे : ‘शेतीविषयक शिक्षणामध्ये नाविन्यपूर्ण बदल केले जात आहेत. सरकारनेही चांगल्या योजना निर्माण केल्या आहेत. शिवाय, आपल्याकडे बहुतांश विद्यार्थी मुख्य व्यवसाय शेती असलेल्या भागातून येतात. मात्र, आर्थिक पाठबळाच्या अभावामुळे त्यांना उच्च शिक्षण घेण्यात अडचणी येतात. अशावेळी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या
आंतरराष्ट्रीय विज्ञानपट महोत्सवात पुणेकर ‘कस्तुरी’च्या यशाचा दरवळ पुणे : दहावीत शिकणाऱ्या कस्तुरी कुलकर्णीने बनवलेल्या ‘सिंबायोसिस’ या लघुपटाला ‘इंटरनॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’मध्ये तृतीय पुरस्कार मिळाला आहे. कस्तुरी ‘बेरीज वजाबाकी’ या मराठी चित्रपटाची सहाय्यक दिग्दर्शकसुद्धा आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language